मालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । मालवण

घरात वीज उपकरणाची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसून मालवणमधील न्हिवे येथील तुकाराम रामचंद्र पाताडे (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. पाताडे धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे कामाला होते. त्यांच्या मृत्यूमुळे न्हिवे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे.