
सामना प्रतिनिधी । मुंबई
विवाहित असूनही तिचे शेजारच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्याच तरुणाला दुसऱया महिलेच्या मिठीत पाहून तिचा पारा चढला आणि ती विनाकारण बोंबाबोंब करू लागली. यामुळे संतापलेल्या तरुणाने तिचा काटा काढला. गोरेगाव येथील गुडीया निषाद या महिलेच्या हत्येप्रकरणी क्राइम ब्रँच युनिट-११ च्या पथकाने बहाद्दूर बिंद याला वाराणसी येथून अटक केली.
गोरेगावच्या प्रेमनगरमध्ये राहणाऱया गुडीया निषाद या ३० वर्षीय विवाहित महिलेची शनिवारी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्येनंतर शेजारी राहणारा बहाद्दूर हा तरुण फरारी झाला. पोलीस उपायुक्त निसार तांबोळी, युनिट-११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, रईस शेख, सहायक निरीक्षक शरद झिने, नितीन उत्तेकर यांच्या पथकाने बहाद्दूर याचा शोध सुरू केला. वेगवेगळी ठिकाणे बदलणाऱया बहाद्दूरला पोलिसांनी वाराणसी येथून अटक केली. विवाहित गुडीया हिचे बहाद्दूर याच्याशी अनैतिक संबंध होते.


























































