एकतर्फी प्रेमप्रकरणातून मामेबहिणीने तरुणाला जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील वजिराबाद भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या मामेबहिणीने पेट्रोल टाकून जाळल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये शुक्रवारी तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीसांनी एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज लावला असून अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात तरुणीने त्याला घरी बोलावले आआणि त्याच्यावर पेट्रेल टाकले. यामध्ये तरुण 75 टक्के भाजला होता. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाचे नोमान असे नाव असून तो तरुणीचा नातेवाईक आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमप्रकरण समोर आले आहे आणि मृत तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने लग्नास नकार दिला होता. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नोमानने प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल आणून स्वतःला पेटवून घेतले होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे, कारण सुरुवातीच्या तपासात नोमनच्या जबाबात काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. नोमन एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीत काम करत होता. हल्ल्यापूर्वी आयपीसीच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी नोमनचा मृत्यू झाला. घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून कपडे आणि मोबाईल फोनसह पुरावे जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पुरावे गोळा केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.