
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडला होता. अक्षय वसंत रेटवडे (वय 25, रा. रेटवडे, खेड) असे अपघतात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवकल्याण वसंत रेटवडे (वय 23) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास अक्षय दुचाकीवरुन नऱ्हेतील स्वामी नारायण मंदीरासमोरील रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. जे. वाघमारे तपास करीत आहेत.
































































