स्वस्त कांदा विक्रीमुळे दगडफेक, लुटमार हल्ल्याच्या भीतीने हेल्मेट घालून कांद्याची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण हिंदुस्थानात कांद्याचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध व्हावा म्हणून पाटणा येथील बिस्कोमान या सहकारी संघटनेने 35 रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री सुरू केली. त्यामुळे कांदा विक्री केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली. परिणामी दगडफेक आणि लुटमारीच्या भीतीने कांदा विकणारे कर्मचारी हेल्मेट घालून कांदा विकताना दिसले.