कोरोनाच्या धसक्यामुळे ऑनलाइन शॉपिंग वाढली!

171

जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कामगारवर्गालाही वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मॉल्स आणि मुख्य बाजारपेठा बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक आता ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडताना दिसत आहेत. ई-कॉमर्स साइट ऍमेझॉनच्या ऑर्डरमध्ये भरमसाट वाढ झाल्याने कंपनीला कामगारांचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने अमेरिकत तब्बल एक लाख नोकऱया देण्याचा निर्णय घेतला आहे. फुल आणि पार्ट टाइम स्वरूपात या नोकऱया देण्यात येणार आहेत. गोडाऊन कर्मचारी ते डिलीव्हरी बॉय स्वरूपात नोकऱया दिल्या जाणार आहेत. सध्या कंपनीकडे 7 लाख 98 हजार कर्मचारी आहेत. नवीन कर्मचाऱयांना तासाला 2 ते 15 डॉलर पगार देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या