ट्विटरवर पैसे कमवण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
twitter

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणारे आणि त्यावर जास्त फॉलोअर्स असणाऱया युजर्ससाठी चांगली खबर आहे. ट्विटरवर आता यूटय़ुब आणि इन्स्टाग्राम यांच्याप्रमाणे युजर्सला पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. ट्विटर कंपनीने नुकतेच दोन फीचरची घोषणा केली आहे.

ट्विटरच्या घोषणेनुसार, युजर्सला आपल्या फॉलोअर्सला अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची, ग्रुप आधारित स्पेशल कंटेट तयार करण्याची आणि गुपमध्ये सामील होण्याची सुविधा उपलब्ध असेल. व्हर्ज या आंतरराष्ट्रीय वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुपर फॉलो पेमेंट फिचरमुळे युसर्ज आपल्या फॉलोअर्सला अतिरिक्त कंटेंटपर्यंत पोचवण्यासाठी पैसे घेऊ शकतील. ट्विटर युजर्स दरमहा 4.99 डॉलर कमवू शकतात, असे ट्किटर कंपनीने क्रीनशॉट्सच्या माध्यमातून दाखवले आहे. ट्विटरला आपल्या युजर्सला त्यांच्या चाहत्यांद्वारे कमाईचे साधन उपलब्ध द्यायचे आहे, मात्र त्याची सुरुवीत कधीपासून होणार, याबाबत कंपनीने घोषणा केलेली नाही.