‘मिशन शक्ती’वरून विरोधकांची पंतप्रधानांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या जनतेला महत्वाचा संदेश दिला. हिंदुस्थानच्या वैज्ञानिकांनी मिशन शक्ती ऑपरेशन यशस्वी करत लो अर्थ ऑरबिट या उपग्रहाला ए सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट केले असे पंतप्रधानांनी सांगितले. या मिशनचा पंतप्रधान लोकसभा निवडणूकीसाठी फायदा करून घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हिंदुस्थान अंतराळातही ‘चौकीदार’, उद्ध्वस्त केला उपग्रह!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपा अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांना मिशन शक्तीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांना जागतिक नाट्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मिशनच्या आड राजाकरण करत असून त्याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

 

ममता बॅनर्जी यांनी आजची पंतप्रधानांची घोषणा म्हणजे त्यांचे प्रसिद्धी मिळविण्याचे नाटक असल्याचे म्हटले आहे. या घोषणेतून ते राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आचारसंहीतेचे हे उल्लंघन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवसभरातील एक तास संपूर्ण देशाचे स्वत:कडे लक्ष वेधून घेतले. देशातील बेरोजगारी, ग्रामीण स्तरावरील संकटं, महिलांची सुरक्षा याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं अशी टीका अखिलेश यादव यांनी सांगितले.