
धारधार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची घटना 23 मार्चला कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडी मशीन चौकातील एका बंद हॉटेलनजीक अनोळखी तरूणावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे तपास करीत आहेत.





























































