घर, ऑफिसमध्ये बीम खाली का बसत नाही?

Overhead Beams Vastu Shastra

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुविशारद)

वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा, देवघर स्वयंपाकघर इ. गोष्टींना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व बीमला आहे. पूर्वीच्या काळाची माणसे आढ्याखाली (बीम ) बसू नका रे !! ही सक्त ताकीद द्यायचे. आढ्याखाली जेवू नये, झोपू नये हा अलिखित नियमच असायचा. एवढेच काय अगदी हळदी-कुंकू लावतांनाही आढ्याखाली उभे राहू नये असे सांगण्यात यायचे. परंतु काळाच्या ओघात हे सर्व विरून गेले. हल्लीतर जागेच्या अभावामुळे बीमखाली सोफा,डायनिंग टेबल सर्रास ठेवले जाते. काही ठिकाणी मी वास्तू व्हिजिटला गेले असता बेडरूममध्ये असलेल्या बीमखाली बेड ठेवलेला आढळलेला आहे.

बीमखाली का बसू नये? –

बीम आणि पिलर ह्यावर बिल्डिंगचा भार असतो त्यामुळेच त्यात जास्तीतजास्त लोखंडाचा (लोखंडाच्या सळया ) वापर केला जातो. ह्या साळयांमधून नकारात्मक ऊर्जा सतत वाहत असते. त्यामुळे ह्या सळयांखाली बसू नये हे शास्त्र सांगते. तसेच बीमने कंस्ट्रक्शनचा भार उचलेला असतो. ह्या भाराचा सतत नकारात्मक स्रोत वाहत असतो. ह्यामुळेच बीमखाली बसणाऱ्या अथवा झोपणाऱ्या व्यक्तिवर ह्याचा शारीरिक परिणाम होण्यास प्रारंभ होतो. माझ्या बऱ्याच जातकांनी जेव्हा वास्तूत शांत झोप न येण्याची तक्रार केली आहे किंवा सतत डोकेदुखी,अंगदुखीची तक्रार केलेली आहे तेंव्हा 90% वेळेस जातक बीमखाली झोपत होता हे निरीक्षण आहे.

त्याचप्रमाणे जिन्याखाली सुद्धा झोपणाऱ्या व्यक्तिसुद्धा वरीलप्रमाणेच तक्रार करतात. जाण्यासाठीसुद्धा तेच कारण पूरक आहे. जिन्यात जास्तीतजास्त सळयांचा वापर होतो. त्यामुळे जिन्याखाली सतत बसल्याने अथवा झोपल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवायला लागतो.

बीमखाली बसण्याचे काय दुष्परिणाम आहेत?

बीमखाली बसण्याने अथवा झोपल्याने कालांतराने आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होण्यास सुरवात होते. त्यामुळे सुरवातीला अंग जड होणे,चिडचिड होणे, पचनाचा त्रास होणे आणि नंतर अर्धशिशीचा त्रास होणे (migraine), मानदुखीचा त्रास होणे (Spondylosis) हे निरीक्षण आहे.

ऑफिसमधील वास्तू तपासून घ्या –

वास्तू म्हणजे वसणे,तुमचा वावर. तुम्ही जिथे सतत वावरता, राहता तिथली ऊर्जा हे साकारात्मक असायला हवी. तुम्ही घरी बीमखाली झोपत नसाल परंतु ऑफिसमध्ये तुमची बसण्याची जागा जर बीमखाली असेल तर वरील व्याधी तुम्हाला जडण्यास वेळ लागणार नाही कारण तुम्ही सतत त्या नकारत्मक ऊर्जेत राहता.

बीमखाली बसल्याने किंवा झोपल्याने त्याचे वाईट परिणाम कधीपासून मिळू लागतात ?

वास्तूशास्त्र हा विषय खरंतर खूपच गहन आहे. जितकी वेगवेगळी घरे तितका त्यांच्या ऊर्जेचा अभ्यास हा वेगळाच असतो. तसंच तुमची स्वतःची कुंडली किती Positive आहे हे सुद्धा महत्त्वाचे. त्यामुळे बीमखाली बसल्याने जे परिणाम मिळतात ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असू शकतात आणि तसंच ते प्रत्येकाच्या बाबतीत काही काळाच्या फरकाने मिळतात. परंतु त्याचे Negative Effects मिळतात हे पहाण्यात आले आहे.

ह्यांवर काही उपाय आहे का ?

बीमखाली बसल्याने जे दुष्परिणाम मिळतात त्याबद्दलची माहिती आपण वाचलीत आता त्यावरील उपाययोजना पाहू. काहीवेळेस घरातील अंतर्गत रचना बदलू शकत नाही. बेडरूममधील बीमखाली असलेला बेड किंवा तुमचे Dinning Table ह्यांची जागा बदलणे शक्य नसल्यास एक उपाय सुचविला गेला आहे. उपाय खालीलप्रमाणे – :

बीमची जी खालची बाजू असते त्या जागेवर दोन बासुऱ्या एकावर एक फुल्लीच्या आकारात लावणे. ह्यामुळे बीममधून मिळणारी नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होईल. जर बीमची लांबी जास्त असेल तर तीन ते चार बासूरींच्या फुल्ल्या लावू शकाल.

जमल्यास ऑफिसमध्ये बीमखाली बसण्याची रचना असूच नये. तुमची खुर्ची तिथे असल्यास वास्तू जाणकाराला विचारून दुसऱ्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करून घ्यावी.

आजचा लेख तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरेल.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या