सिंधू, गोपीचंद विलगीकरण कक्षात, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या तैवानच्या खेळाडूला कोरोना

1205

इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनिशमध्ये तैवानच्या संघासोबत सरावासाठी असलेल्या दहा वर्षीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना धक्का बसलाय. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी स्वतःला विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.

बर्मिंगहॅममध्ये मागील आठवडय़ात झालेल्या या स्पर्धेत सिंधू, सायना, किदाम्बी श्रीकांतसह हिंदुस्थानचे आणखी काही बॅडमिंटनपटू सहभागी झाले होते, मात्र या स्पर्धेत तैवान संघांसोबत असलेल्या ज्युनियर खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू घाबरले आहेत. सायनाने दोनच दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनावर टीका केली होती. कमाई करण्यासाठी स्पर्धा आयोजक खेळाडूंना वेठीला धरत आहे, असा थेट आरोपही तिने केला होता.

सिंधूचे वडील पी. व्ही. रमन्ना म्हणाले, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे 11 मार्चपासून विमानोड्डाणावर निर्बंध घालण्यात आले. त्यावेळी गोपीचंद यांच्याशी चर्चा करून आम्ही स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा फैलाव होत असताना इंग्लंडमध्ये कोणीही मास्क घालत नव्हते, मात्र आम्ही मास्क घालून स्वतःची काळजी घेत होतो. तुळशीच्या पानांमध्ये उकळलेल्या पाण्याचा आम्ही वापर केला. मात्र तरीही इंग्लंडहून परतल्यावर मी, सिंधू आणि गोपीचंद स्वतःहून विलगीकरण कक्षात सहभागी झालो. आम्ही 14 दिवस कोणालाच भेटणार नाही आहोत. सिंधू टेरेसवरच व्यायाम करते व घराजवळच जॉगिंग करते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे रमन्ना यांनी सांगितले.

मेरी कोमचा बेजबाबदारपणा
– जॉर्डनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेनंतर हिंदुस्थानची स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोम मायदेशी परतली. कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता तिने विलगीकरण कक्षात जाणे गरजेचे होते, मात्र, मेरी कोम जॉर्डनहून आल्यानंतर राष्ट्रपती भवनात गेल्याने ती वादात अडकण्याची चिन्हे आहेत. 13 मार्चला मायदेशात परतल्यानंतर मेरी कोम 18 मार्चला राष्ट्रपती भवनातील ब्रेकफास्ट कार्यक्रमात सहभागी झाली. वास्तविक मायदेशी परतल्यानंतर तिने 14 दिवस विलगीकरण कक्षात राहणे अपेक्षित होते. या बेजबाबदार वर्तनामुळे मेरी कोम आता टीकेची धनी ठरली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश व राजस्थानहून आलेल्या खासदारांना नाश्ता करण्यासाठी बोलावले होते. यावेळी बॉक्सर मेरी कोमही आली होती. राष्ट्रपतींनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून टाकलेल्या फोटोमध्ये मेरी कोम दिसत असल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली

आपली प्रतिक्रिया द्या