वादळामुळे भरकटलेल्या शॅडॉक खलाशाचा तब्बल दोन महिन्यांनी शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत महासागरात वादळामुळे भरकटलेल्या बोटीवरील टीममधील शॅडॉक या खलाशाचा तब्बल दोन महिन्यांनी शोध लागला आहे. मेक्सिकोहून फ्रेंच पॉलिनेशियाकडे निघालेल्या टीमची बोट जोरदार वादळामुळे भरकटली आणि त्याचा संपर्कही तुटला. या कालावधीत केवळ बेला या माझ्या कुत्र्याची सोबत होती म्हणूनच मी तग धरला. पावसाचे पाणी पिऊन आणि मासे खाऊन मी जगत होतो, असे त्याने त्याचा शोध घेणाऱया हेलिकॉप्टरमधील डॉक्टरांना सांगितले.