पैठण बसस्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या बसगाड्या बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण बसस्थानकावरुन बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बसगाड्या रविवार दुपारपासून बंद करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड व नांदेड परिसरात अनुचित प्रकार घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बस आगार प्रशासनाने जाहीर केले. दरम्यान रविवार असल्याने विद्यार्थ्यांना याची झळ बसली नाही. तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने वारकरी आणि पर्यटक कुटुंबांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले. पैठण हे मोक्षधाम मानले जात असल्याने येथील गोदावरी नदीच्या काठावर दररोज शेकडो मयतांचे दशक्रिया विधी केले जातात. अचानक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे विधी पार पडलेल्या अनेक कुटुंबांनी येथील काळिपिवळी पॉइंटवर प्रचंड गर्दी केली होती.