
पाकिस्तानच्या सत्तेवर कायम लष्कराचे नियंत्रण राहिले आहे. आता लष्कराची पकड आणखी घट्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानात नुकतीच 27 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. याद्वारे मुनीर यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण लष्कराचा ताबा घेतला आहे. ते आता लष्कर, वायू सेना आणि नौदलाचे प्रमुख असतील. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा राहणार आहे. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष हे पदही रद्द करण्यात आले असून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा ताबादेखील मुनीर यांच्याकडे आला आहे. हे अधिकार यापूर्वी राष्ट्रपती व मंत्रिमंडळाकडे होते.






























































