पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांचे निधन झालं आहे. दुबई येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेला बराच काळ ते आजारी होते. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

परवेझ मुशर्रफ हे बराच काळ आजारी होते. दुबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुशर्रफ 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. 1999 ते 2008 या काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून ते काम करत होते.

2016 पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावं लागलं होतं. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना मुशर्रफ यांनी हिंदुस्थानवर कारगिल युद्ध लादलं होतं. हिंदुस्थानी सैन्याने शौर्याची परिसीमा गाठून देशांच्या सीमांचं रक्षण केलं होतं.