कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए)मध्ये पाकिस्तानने कश्मीरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर हिंदुस्थानकडून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या फसव्या दाव्यांमुळे या सत्यात काहीही बदल होणार नसल्याचे हिंदुस्थानने ठणकावले आहे.

कश्मीरमध्ये होणारा हिंसाचार, हत्या आणि नरसंहार गंभीर असून त्याकडे संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिका लोधी यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानने केलेल्या या दाव्याचा हिंदुस्थानने निषेध केला. पाकिस्तानने कितीही फसवे दावे केले तरी सत्य बदलणार नाही, कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे असे हिंदुस्थानचे सचिव संदीपकुमार बय्यापू यांनी सांगितले. गेल्या दशकभरापासून हिंदुस्थान शांततेसाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून त्याला खोडा घालण्यात येत आहे. पाकिस्तानने या व्यासपीठाचा गैरवापर करत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांनीही त्याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या