
पाकिस्तानमध्ये एक आत्मघातकी स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत चार सैनिकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
बलुचिस्तानची प्रांताची राजधानी क्वेटा शहरात हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या तीन सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. एका सैनिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
A suicide blast took place this morning at 7:30am at Mastung Road, Quetta of Balochistan targeting Pakistan Army. 5 Pakistan Army soldiers of Frontier Corps killed, 20 others wounded. Pakistani Taliban has claimed responsibility for the attack saying they killed 25 Pak soldiers. pic.twitter.com/tYPrCtWi9b
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) September 5, 2021
तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्विकारली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Condemn the TTP suicide attack on FC checkpost, Mastung road, Quetta. My condolences go to the families of the martyrs & prayers for the recovery of the injured. Salute our security forces & their sacrifices to keep us safe by thwarting foreign-backed terrorists’ designs.
— Imran Khan (@ImranKhanPTI) September 5, 2021
या हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन पोलीस कर्मचार्यांcचा समावेश आहे असे सांगण्यात येत आहे.
























































