
सामना ऑनलाईन । श्रीनगर
हिंदुस्थानचा कुरापती शेजारी पाकिस्तानने सोमवारी प्रत्यक्ष नियंत्रन रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने पुंढ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी भागामध्ये तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एक जवान शहीद झाला आहे, तर चार जवान जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामध्ये एका पाच वर्षीय मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Visuals from Poonch District Hospital: Total 5 security personnel got injured, of which 1 succumbed to his injuries, in ceasefire violation in Mankote & Krishna Ghati sectors of Poonch district, today. A 5-year-old girl has also died in the ceasefire violation. #JammuAndKashmir pic.twitter.com/hMC4RnmqGt
— ANI (@ANI) April 1, 2019
जम्मू-कश्मीर: पुलवामामध्ये चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान
पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना पाकिस्तानी सैन्य सीमारेषेवरही आगळीक करत आहे. सोमवारी सकाळपासून पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरामध्ये शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये हिंदुस्थानचे पाच जवान जखमी झाले होते. सर्व जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा घुसखोरीचा प्रयत्न वायुसेनेने उधळला
दरम्यान, मानवी वस्तीला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारामध्ये एका पाच वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. पुंछ जिल्ह्याचे डीडीसी राहुल यादव यांनी ही माहिती दिली आहे.




























































