
>> सचिन जगताप
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्याजवळ धाड टाकत पालघर च्या तहसीलदारांनी अवैध माल पकडून दिला.तहसीलदारांनी धाड टाकल्यानंतर स्थानिक पोलिस अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोचले.या कारवाईत रसायनांचे ड्रम आणि लोखंडी सळया जप्त करण्यात आल्या असून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्याजवळ धाड टाकत पालघरच्या तहसीलदारांनी अवैध माल पकडून दिला. तहसीलदारांनी धाड टाकल्यानंतर स्थानिक पोलिस अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहोचले. या कारवाईत रसायनांचे ड्रम व लोखंडी सळया जप्त करण्यात आल्या असून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. pic.twitter.com/0jKg9fjryv
— Saamana (@SaamanaOnline) January 31, 2023
मुंबई-अहमादाबाद महामार्गावरील आवढाणी बेलपाडा येथील अमन ढाब्याच्या मागच्या बाजूला चोरीचा माल लपवून ठेवल्याची गुप्त माहीती पालघर चे तहसीलदार सुनील शिंदे यांना मिळाली होती.त्यानुसार तहसीलदार शिंदे यांनी आपल्या महसूल कर्मचारी यांना सोबत घेत दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकून लिक्विड पॅराफीन भरलेले 200 लिटरचे 25 ड्रम आणि लोखंडी सळया असा चोरीचा माल पकडला.यानंतर तहसिलदार शिंदे यांनी याची माहीती मनोर पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी पोचले.पोलिसांनी चोरीचा माल पंचनामा करून चोरीचा उतरवलेला माल ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी एका टँकर चालकास ताब्यात घेण्यात आले असून तहसीलदारांनी धाड टाकताच या अवैध धंद्यांचा म्होरक्या किसन मात्र पळून गेला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या ढाब्यांवर अवैध धंदे सुरू आहेत. मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव, आवंढाणी, चिल्हार,वाडाखडकोना, दुर्वेस,हालोली,कुडे या गावच्या हद्दीत बायोडिझेल,डिझेल,नाफ्ता,डांबर,केमिकल आणि सळया चोरून विकण्याचे धंदे जोरात सुरु आहेत.मनोर पोलिसांच्या कारवाईनंतर काही महिने हे अवैध धंदे काही दिवस बंद झाले होते त्यानंतर महामार्गावरील अवैध धंद्याचे माफिया पुन्हा सक्रिय झाले असून अवैध धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत.महामार्गालगतचे ढाबे आणि अन्य ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि माफियांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.