परळी तालुक्यात लम्पी आजाराचा पहिला बळी, नाथरा येथील एका बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी तालुक्यातील नाथरा येथील एका बैलाचा लंपी आजाराने सोमवारी दि.17 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा पशू तालुक्यातील लंपीचा पहिला बळी आहे.गेल्या काही दिवसांपासून लंपी आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे.

नाथरा येथील शेतकरी पुष्पवर सदाशिव मुंडे यांच्या बैलाला 15 ते 20 दिवसांपूर्वी लंपी आजार झाला होता. यानंतर तो बराही होवू लागला होता पण सोमवारी अचानक या बैलाचा मृत्यू झाला आहे.येथील तलाठी यांनी या बैलांच्या मृत्यूचा पंचनामा केला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने घोषित केलेली आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी मुंडे यांनी केली आहे.