परळीच्या महानिर्मितीत अंधार, तब्बल 24 तास औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कार्यालयात वीज बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या परळी येथील महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता कार्यालयाचा विद्युत पुरवठा तब्बल 24 तासाहून अधिक काळ खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण कार्यालय रात्रभर अंधारात होते.

परळी महानिर्मितीत 250 मेगावव्हॅटचे तीन संच आहेत यातून निर्मिती होणाऱ्या वीजपुरवठा राज्याला केला जातो. खडका येथील सबस्टेशन मधून परळी महानिर्मिती कार्यालयाला वीजपुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी झालेल्या पावसाने या सब स्टेशन मध्ये झालेल्या बिघाडाने महानिर्मितीचे मुख्य कार्यालय अंधारात होते, यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.

बुधवारी दुपारी 3 वाजता हा वीज पुरवठा सुरुळीत झाला. पुढे अनेक तास प्रयत्न करून खडका सबस्टेशन मधून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. हा वीजपुरवठा कुठल्या कारणामुळे खंडित झाला याचे कारण अजून समोर आलेले नाही. जिथे विद्युत निर्मिती केंद्र कार्यालयाचाच वीजपुरवठा खंडित होऊ शकतो तिथे आपले काय अशी चर्चा नागरिकांत रंगली होती. मात्र यामुळे महानिर्मितीची नाचक्की झाल्याचे पाहायला भेटले.