
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेंबर 2018 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत पार पडणार आहे. आज संसदीय कामकाज केंद्रीय समितीने (सीसीपीए) या अधिवेशनाचा कालावधी जाहीर केला. सलग दुसऱया वर्षी हे अधिवेशन डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.
नेहमीच्या परंपरेनुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात पार पडते. पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा संसद अधिवेशन उशिराने घेतले जाणार आहे.

























































