बाहेरच्या राज्यातील नागरिक आले तर जम्मू कश्मीरमध्ये बलात्कार वाढतील, पीडीपी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मिरात आता कोणत्याही हिंदुस्थानी नागरिकाला जमीन खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने पूर्वीचा कायदा रद्द करून हा महत्त्वपूर्ण अध्यादेश जारी केला आहे मात्र या अध्यादेशाला नंतर या अध्यादेशावर टीका करताना जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी चे नेते व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे जवळचे संबंध असलेले सुरेंद्र चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे

जर बाहेरच्या राज्यातील नागरिकांना जम्मू-काश्मीर मध्ये जमीन खरेदी करण्याचे परवानगी दिली तर इथे बलात्काराचे प्रमाण वाढेल. जम्मू-काश्मीरमध्ये डोंगरा संस्कृती आहे आम्ही देशासाठी बलिदान दिले आहे आम्ही असं नाही म्हणत की बाहेरचे नागरिक आल्याने इथे बलात्कार होतील पण बाहेरचे नागरीक आल्याने इथे बलात्कार वाढू शकतात जम्मू एक शांततापूर्ण जागा आहे इथे मुली दूरदूरच्या गावावरून येतात व शिक्षण घेऊन परत जातात तिथे बघा दररोज किती दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात.

गेल्या वर्षी जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35-ए केंद्र सरकारने हटविले आणि जम्मू-कश्मीर व लेह-लडाख असे अशा दोन केंद्रशासित प्रदेशात आता देशातील कोणत्याही नागरिकास जमीन खरेदी करता येईल. तेथे राहता येईल.

उद्योग-व्यवसाय त्या जमिनीवर उभारता येणार आहेत. दरम्यान, जम्मू-कश्मीरात उद्योग यावेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी यामागची भूमिका आहे. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन यामुळे वाढेल. मात्र, शेतजमीन राज्यातील लोकांकडेच राहील, अशी माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. दरम्यान, लेह-लडाखबाबत केंद्र सरकार स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे. यापूर्वी जम्मू-कश्मीरात जन्मलेल्या नागरिकालाच तेथे जमीन, घर खरेदी करता येत होते.