कायमस्वरूपी काढलेला टॅटू आता नकोसा झालाय, तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘हे’ करा सुरक्षित उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याचा ट्रेंड आहे. काही वेळा असंही होतं की, मनासारखा टॅटू येत नाही.काढताना काही चुका होतात. अशावेळी तो टॅटू नकोसा वाटतो. कधी कधी तर सुरुवातील टॅटू आवडतो. नंतर तो काढून टाकावा,असे वाटते. अशावेळी काळजी करण्याचे कारण नाही;कारण तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, असे टॅटू सुरक्षितपमणे कायमस्वरुपी काढता येऊ शकतात, मात्र कायमस्वरुपी टॅटू काढल्यामुळे त्वचेवर डाग राहण्याचा धोकाही असतो. यामुळे इन्फेक्शन आणि पिगमेंटेशनच्या समस्याही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेझर ट्रिटमेंट
टॅटू रिमूव्ह करण्यासाठी लेजर ट्रीटमेंटचा सहारा घेतला जाऊ शकतो, कारण यामध्ये लेढर बीमद्वारे पिगमेंट किंवा डायला तोडून टॅटू फेज करण्यात येतो. यामुळे प्रभावित भागांतील स्किन ट्रिटमेंटनंतर पाढऱ्या रंगाची होते. टॅटू काढून टाकण्यासाठी अनेक सेटिंग्ज करण्यात येतात. ही ट्रिटमेंट फार खर्चिक असते. अनेकदा टॅटू पूर्णपणे नाहीसा होण्याऐवजी लाइट होतो. तसेच यामुळे अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन होण्याचाही धोका असतो.

सर्जिकल मेथड
शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी टॅटू काढले जाऊ शकतात. यासाठी भूल देऊन त्वचा सुन्न केली जाते. यानंतर सर्जिकल ब्लेडच्या मदतीने टॅटू काढला जातो. सर्जिकल टॅटू काढणे प्रभावी आहे. पण कधी कधी डाग पडतात. ही पद्धत सहसा लहान टॅटूसाठी राखीव असते आणि ती खूप प्रभावी असू शकते, परंतु ती सर्वात धोकादायक पद्धत देखील आहे. डाग पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि जखम बरी होण्याचा वेळ जास्त असू शकतो.

डर्माब्रेसन
डर्माब्रेसन एक मेडीकल प्रक्रीया आहे, ज्यामध्ये त्वचेची एपिडर्मिसला एब्रेसन किंवा सँडिग हटवलं जातं. यानंतर नवीन स्किन लेयर तयार होते. परंतु यामध्ये त्वचेवर डाग राहू शकतो. बॅलून्सचा प्रयोग करताना टॅटूचा सर्जिकल रिम्ह्यूवल जे स्किनमध्ये इन्सर्ट करण्यात येतं आणि त्यामुळे टिश्यू एक्सपॅन्शन होतं. टॅटू असणारी स्किन निघून जाते आणि टिश्यू पसरल्यामुळे डाग राहण्याची शक्यता कमी असते.

मिठाचं पाणी
लेझर ट्रिटमेंट किंवा इतर टॅटू रिमूव्ह करणयासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटपैकी सर्वात सोपा आणि घरच्या घरी करण्यात येणारा उपाय म्हणजे, मीठाचं पाणी. पाण्यामध्ये मीठ एकत्र करून कॉटनच्या सहाय्याने टॅटूवर रब करा.हा उपाय दररोज करा पण अर्ध्या तासापेक्षा जास्त असं करू नका.