
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
गणपत आदिक वय हे मोटर सायकलवरुन कोपरगावकडे येत असता ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना मुर्शतपूर फाटयाजवळ शनिवारी सायकाळी 7.30 वा.सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की मयत सुर्यभान आदिक हे कारवाडी शहापूर येथुन मोटर सायकलवरुन कोपरगांवकडे येत होते तेव्हा मुर्शतपूर फाटयाजवळ रोडच्या खडीवरुन ते घसरले त्याचवेळी मागून येणार्या व ऊसाने भरलेल्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांची जबर धडक सुर्यभान आदिक यांच्या मोटर सायकलला बसली व ट्रॉलीचे मागचे चाक त्यांच्या छातीवरुन गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना कळताच तातडीने रुग्णवाहिकेत त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
























































