Photo – जान्हवीच्या लेडी बॉस लूकने चाहत्यांची मने जिंकली, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलमुळे चाहत्यांची मनं जिंकते. जान्हवीने नुकतेच तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती लेडी बॉसच्या लूकमध्ये दिसत आहे. जान्हवी निळ्या रंगाच्या थ्री पिस पॅण्ट सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या लूकवर तिने अंगठी, नेकपीस घालून लूक पूर्ण केला आहे. तर केस मोकळे सोडले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे लाखो चाहते तिच्या या बॉसीलूकवर फिदा झाले आहेत.