Photo – प्रसिद्ध अभिनेत्रीला हिंदू मंदिरात प्रवेश नाकारला

प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलला सोमवारी अलुवा येथील थिरुवैरानिककुलम महादेव मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.

या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो, ज्यामुळे अमला हिला मंदिरात प्रवेश मिळाला नाही

मंदिरात प्रवेश न मिळाल्याने तिने रस्त्यावरच उभं राहून नमस्कार केला असं तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे

हिंदू संघटनेचे नेते आर. व्ही. बाबू यांनी मागणी केली की, हिंदू धर्मगुरूंनी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केला पाहिजे

निमय बदल करून इतर धर्माच्या लोकांनाही मंदिरात प्रवेश मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे

गैरहिंदू धर्मीयांना मंदिरात प्रवेश द्यावा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही घेतली आहे

केरळ हिंदू सार्वजनिक प्रार्थना स्थळ कायदा 1965 मध्येच लागू झाला आहे. याचा अर्थ त्यापूर्वी, गैरहिंदूंना नियमानुसार मंदिरात प्रवेश नाकारला जात नव्हता,” असं पॉलने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.