देशभरात 9 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात 9 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार असून या गाडय़ांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. राजस्थान, तामीळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये नव्या वंदे भारत गाडय़ांमुळे कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. वंदे भारत गाडय़ांना पसंती मिळत असून आतापर्यंत या गाडय़ांमधून 1 कोटी 11 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्र वंदे भारतशी जोडले जाईल तो दिवस आता दूर नाही. ज्यांना कमीत कमी वेळेत लांबचा पल्ला गाठायचाय त्यांच्यासाठी वंदे भारत अत्यंत उत्तम अशी सुविधा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.