
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, त्याची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. प्रीतीविरोधात ईडीने ही पहिली तक्रार दाखल केली आहे. पीएनबी घोटाळ्यात प्रीती यांनी पती मेहुल चोक्सीला मदत केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने मार्चमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रात ईडीने मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती ही पीएनबी बँक घोटाळ्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. प्रीतीही 2017 पासून फरार असून ती पतीसह परदेशात लपून बसल्याचा दावा ईडीने केला.
























































