प्रसिद्ध पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदनानंतर धक्कादायक माहिती आली समोर

पॉर्न स्टार जेसी जेन हिचा जानेवारी 2024 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. 24 जानेवारी रोजी जेसी जेन आणि तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलर दोघेही मृतावस्थेत आढळून आले होते. या दोघांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

न्यू यॉर्क टाईम्स (NYT) अहवाल नुसार,जेसी जेन आणि तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलर यांचा मृत्यू ड्रगच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचा पोलिसांना संशय होता.  आता  हा संशय आता खरा ठरला असून ओक्लाहोमा वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने याची पुष्टी केली आहे. दरम्यान जेसी जेन आणि ब्रेट हसनम्युलर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेंटॅनाइल आणि कोकेन जास्त प्रमाणात आढळून आले. याच्या अती सेवनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एडल्ट फिल्म स्टार जेसी जेन 2003 मध्ये तिच्या करिअरला सुरूवात केली होती. जेनचा जन्म 16 जुलै 1980 रोजी टेक्सास येथे झाला. 1998 मध्ये तिने मूर हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. जेनने प्लेबॉय चॅनलसाठी ‘नॉटी एमेच्योर होम व्हिडिओ’ आणि ‘नाईट कॉल्स’ असे दोन शो देखील होस्ट केले होते. मात्र, जेनने 2017 मध्ये पॉर्न इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली.