
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पोस्को कायद्याअंतर्गत फाशीच्या शिक्षेची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. १२ वर्षाहून कमी वय असलेल्या मुलीवर अत्याचार व खून केल्यास दोषीला फाशीच्या शिक्षेच्या तरतूदीला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
#CabinetDecision
Children should be protected from sexual offences; Cabinet acts to make
punishment more stringent for committing sexual crimes against children; approves amendments to #POSCO Act@rsprasad @MinistryWCD @Manekagandhibjp pic.twitter.com/KTNdHestO0— PIB India (@PIB_India) December 28, 2018
केंद्र सरकारने पोस्को कायद्यातील बदलांना मंजूरी देऊन लहान मुलांवर अत्याचार विरोधी कायदा अजून कडक केला आहे. हा कायदा फक्त कडक केला नसून या कायद्याचा अजून विस्तार केल्याचे रवीशकंर यांनी म्हटले. पोस्कोच्या अधिनियम ९ अजून कडक केल्याचे त्यांनी सांगितले.
लहान मुलांची पोर्नोग्राफी बंद करण्यासाथी पोस्कोतील २०१२ च्या कलम १४ आणि १५ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला आहे. मुलांसबंधी पॉर्न राखने, डीलीट न करने यावरही दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.


























































