
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीने राजस्थानमध्ये 150 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला असून आजपासून येथून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. 756 एकर जागेत उभारलेल्या या सौर प्रकल्पातून वर्षाला 350 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे. टाटा पॉवरकडून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर दिला जात आहे. त्यानुसारच सदरचा 150 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे तयार होणारी वीज ग्रीडच्या माध्यमातून टाटा पॉवरच्या वीज वितरण नेटवर्कपर्यंत वाहून आणली जाणार आहे. सदरचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने वर्षाला जवळपास 3.34 लाख मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होणार आहे.

























































