डावखरे कुटुंबात फूट, प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी आज सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे डावखरे कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र आपले वडील वसंत डावखरे यांनी दिलेल्या सल्ल्यावरूनच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केले.

प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. प्रबोध हे व्यावसायिक असून त्यांच्या अनेक जिम आहेत. मात्र भाऊ भाजपमध्ये असूनही त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावर प्रबोध म्हणाले, वडील रुग्णालयात असतानाच त्यांनी आपल्याला राजकारणात जाण्याचा निर्णय कधी घेतलास तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा असे सांगितले होते.