सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे बुजगावणे! प्रकाश आंबेडकरांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सोलापूर

सोलापूरमध्ये मोठय़ा प्रमाणावर असलेल्या चर्मकार आणि ढोर समाजासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी काहीच केले नाही. त्यामुळे ते दलितांमधील केवळ एक नाव आणि काँग्रेस पक्षाचे बुजगावणे आहेत, अशी जोरदार टीका सोलापूरमधूनच सुशीलकुमार शिंदे यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.

महाराष्ट्रातील पहिल्या सत्रातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या दिवसभरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथून उमेदवारी अर्ज भरला. त्याच मतदारसंघातून वंचित बहुजन महासंघाचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनीही अर्ज दाखल केला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.