गोव्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र वालावलकर, पणजी

आजपासून म्हणजेच शुक्रवारपर्यंत गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या २४ तासात राजधानी पणजीमध्ये सर्वाधिक म्हणजे ३ इंच पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील बहुतांश भाग जलमय झाले होते. या पावसाचा सगळ्यात जास्त फटका पणजीला बसला होता. सोमवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरामार,सांतिनेज,डॉन बॉस्को शाळा, मळा,कांपाल मैदान,ताळगाव इथले रस्ते पाण्याखाली गेले होते. आझाद मैदानातील क्रांतीदिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रमदेखील भर पावसात पार पडला. गोव्यामध्ये आत्तापर्यंत २०.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे.