
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन बुधवारी झाले. सुप्रीम कोर्टाची नवीन इमारत सौरऊर्जा, पर्यावरण आणि जलसंरक्षणाने परिपूर्ण असल्यामुळे अनोखी असल्याचे कोविंद यांनी सांगितले. या समारंभाला सरन्यायाधीश रंजन गोगोई, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह विधी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
#PresidentKovind inaugurates the Additional Building Complex of the Supreme Court and receives translations of 100 SC judgments in regional languages; says such infrastructure should provide benefits in enhancing speed of adjudication, disposal of cases and delivery of justice pic.twitter.com/S29yztxrZ0
— President of India (@rashtrapatibhvn) July 17, 2019
तब्बल 12.19 एकरांत पसरलेल्या या नवीन इमारतीला भूमिगत मार्गाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीशी जोडण्यात आले आहे. या इमारतीवर 885 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण इमारतीत 825 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाची सर्व प्रशासकीय कामे, खटल्यांचे फायलिंग, न्यायालयाचे आदेश आणि निकालाच्या सर्व प्रती घेणे इत्यादी सर्व कामे आता जुन्या इमारतीतून या नवीन इमारतीत हलवण्यात येणार आहेत, पण न्यायालयांचे कामकाज मात्र जुन्या इमारतीतच राहणार आहे.
निकाल 9 भाषांमध्ये उपलब्ध
यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांच्या सुनावण्यांत सात स्थानिक भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या सुविधेचे अनावरण केले. कोविंद म्हणाले की, आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय इतर स्थानिक भाषांमध्ये होणार असल्यामुळे याचा मला आनंद आहे. हे निर्णय सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार येतील.
नवीन भवनात प्रशासकीय कामकाज आणि रजिस्ट्री
- नवीन भवनात स्प्रीम कोर्टाच्या सर्क दस्तावेजांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. यासाठी एक आयटी सेल बनवण्यात आले आहे.
- जुन्या आणि नव्या इमारतीत ये-जा करण्यासाठी तीन भूमिगत मार्ग आहेत. यातील एक मार्ग न्यायाधीशांसाठी, दुसरा कोर्टातील रेकॉर्डची ने-आण करण्यासाठी आणि तिसरा मार्ग वकिलांसाठी करण्यात आला आहे.
- या इमारतीत 1 लाख लिटर क्षमतेचे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लांट बसविले आहेत. यात पावसाचे पाणी साठवण्यात येणार आहे.
- या भवनात 1800 गाडय़ांच्या पार्किंगची क्षमता आहे.
- नव्या इमारतीमध्ये ज्युडिशरी ब्लॉक, लायब्ररी ब्लॉक आणि ऑडिटोरियम आहे. सोबतच या भवनात सेंट्रलाइज्ड एसी आहे. इमारतीसाठी लागणार्या विजेची 40 टक्के गरज सौरऊर्जेपासून पूर्ण होणार आहे.
- या इमारतीला 650 आणि 250 लोकांची क्षमता असलेले दोन वर्ल्डक्लास ऑडिटोरियम, एक मीटिंग रूम आणि एक मोठी राऊंड टेबल कॉन्फरन्स रूम तयार करण्यात आले आहे.
























































