गोसेवेत स्वत:ला वाहून घेणाऱ्या महाराष्ट्रातील सय्यद शबीर यांनी पद्मश्री प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेली पन्नास वर्षे निस्वार्थपणे गोसेवा करणाऱ्या बीड मधील सय्यद शब्बीर (65) यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.

sayyed-shabbir-22

बीडमधील शिरूरपासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहणारे सय्यद शब्बीर हे गोशााळा चालवतात. सध्या त्यांच्याकडे 86 गाई असून त्यांच्यासेवेसाठी शब्बीर यांच्यासह 10 व्यक्ती कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनशेहून अधिक गाईंना जीवनदान दिले आहे. शब्बीर यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासह गोसेवेत कार्यरत आहेत.

sayyed-shabbir-12

इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा ‘पद्म भूषण’ पुरस्काराने सन्मान

शब्बीर यांच्या वडीलांचा कत्तलखान होता. कत्तलखान्यात दररोज गाईंची हत्या केली जायची ते शब्बीर यांना बघवले गेले नाही व नंतर त्यांनी तो कत्तलखाना बंद करून त्या जागी गोशाळा सुरू केली.त्यांच्या गोशाळेला अनुदान मिळत नाही. फार कुणाची मदतही नाही तरीदेखील शबीर हे गेल्या पन्नास वर्षांपासून शेकडो गाईंचे पालन पोषण करत आहेत.

sayyed-shabbir-33

लोकांना वाऱ्यावर सोडलेल्या किंवा कत्तल खान्यात पाठवलेल्या गाई शब्बीर हे त्यांच्या गोशाळेत घेऊन येतात व त्यांचा सांभाळ करतात. गायीच्या पोटात दोन घास गेले की, आपले पोट भरते, गाय सांभाळणे हे पुण्याचे काम असते, गाय सांभाळली की, देवाचे आशीर्वाद मिळतात याच श्रद्धेपोटी सय्यद शब्बीर यांनी सरकारचे कोणतेही अनुदान न घेता किंवा मदतीची याचना न करता आपला हा गोपालनाचा ‘यज्ञ’ सुरू ठेवला