
बॉलीवूडपासून हॉलीवूड गाठणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या एक्स नात्याबाबत खुलासा केला आहे. प्रियांकाने नुकतेच ‘कॉल हर डेडी’ पोडकास्टच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना प्रियांकाने तिच्या बॉलीवूडमधील एक्स नात्यांवर भाष्य केले.
प्रियांकाला विचारण्यात आले की. ती आपल्या रोमॅंटिक पार्टनर निवडण्यासाठी काही खास पॅटर्न फॉलो करते का असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना प्रियांकाने सांगितले की, असे कोणते पॅटर्न नाहीय. प्रियांकाने स्वत:ला एक ‘मोनोगॅमिस्ट’ म्हणत मी एकापाठोपाठ एक नाते बनवत गेले. मी स्वत:ला वेळ देणे सोडले होते. मी ज्या कलाकारांसोबत काम केले, ज्यांना सेटवर भेटले त्यांनाच डेट केले. मला माहित होते नाते कसे असायला हवे, जो कोणी माझ्या आयुष्यात आला मी त्याला माझ्या साच्यात बसवत गेले.
प्रियांकाने पुढे सांगितले की, रिलेशनशीपमध्ये ती कायम एकच चूक करत होती ती स्वत:ला एका केअरटेकरप्रमाणे वागवत होते. प्रियांकाने सांगितले की, मी माझे काम, माझी आवड आणि आपल्या स्वत:ला महत्व दिले नाही. मला खरोखरच मी एक पायपुसणे वाटू लागले आणि मी अशी होती की हे सामान्य आहे. कारम मी ज्या बॅकग्राऊंडमधून आले जिथे महिलांना शिकवले जाते की, तुम्हाला कुटुंब जोडून ठेवायचे आहे, नवऱ्याला आनंदी ठेवायचे. जेव्हा तो कामावरून घरी परतेल त्यावेळी त्याला आनंदी ठेवण्यासाठी हे करावं लागतं.
पुढे प्रियांकाने सांगितले की, निक तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी ती जेवढ्या रिलेशनशीपमध्ये होती त्यामध्ये तिने स्वत:ला हरवले होते. निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी तिने 2 वर्षांचा ब्रेक घेतला आणि तिने दरवेळी नात्यात ती काय चूक करते ते लक्षात घेतले. त्यावेळी समजले की जोपर्यंत तुम्ही स्वत:ला महत्व देत नाहीत, तोपर्यंत कोणी तुम्हाला समजून घेणार नाही. खरंतर प्रियांकाने आधीते सर्व प्रियकर चांगल्या व्यक्ती असल्याचे सांगितले. ज्यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होते ते चांगले व्यक्ती होते. प्रियांकाचे नाव अक्षय कुमार, शाहरूख खान, हरमन बावेजा आणि शाहीद कपूरसोबत जोडले गेले होते.
























































