प्रो कबड्डी लीग टीम पुणेरी पलटन ‘कू’वर दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणेरी पलटन म्हणजे प्रो कबड्डी लीग टीम्सपैकी एक लोकप्रिय आणि ताकदीची टीम. पुणेरी पलटन आता नुकतीच दाखल झाली आहे ‘कू’ वर! आता आपल्या आवडत्या टीमशी चाहत्यांना मातृभाषेत संवाद साधता येईल. अल्पावधीतच टीमचे या मंचावर 1 हजाराहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. @puneripaltan या आपल्या अधिकृत हॅंडलवरून कू करत टीम सध्या भरभरून व्हिडीओज आणि पडद्यामागच्या खास स्टोरीज पोस्ट करत आहे. तुमचे आवडते खेळाडू लीगच्या आठव्या सीझनसाठी कसून सराव करताना तुम्हाला दिसतील. हा आठवा सीझन यंदाच्या डिसेंबरमध्ये बंगळुरूला पार पडणार आहे.

पुणेरी पलटनने एक लक्षवेधी व्हिडीओही शेअर केला आहे. खेळाच्या रोमांचक घडामोडींवर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ टाकताना ते म्हणतात, ‘‘आता प्रतीक्षा संपली! #BhaariKabaddi साठीची जय्यत तयारी झालीय. सगळे आहात ना तयार?’’  प्रो कबड्डी लीगने कबड्डीसारख्या देशी खेळाला नव्याने लोकप्रियता मिळवून दिली आहे. कबड्डी आता मातीतल्या चाहत्यांसह नव्याने उदयाला येणाऱया खेळाडूंमध्येही जोमदार प्रतिसाद मिळवते आहे. नुकत्याच यू मुंबा आणि तेलुगू टायटन्स अशा प्रो कबड्डी लीगच्या तगडय़ा टीम्सही ‘कू’वर जोशात दाखल झाल्या आहेत. अशा लोकप्रिय संघांचा ‘कू’वरचा वावर खेळासह या मंचाचीही रंगत वाढवेल यात शंका नाही.