
खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दा या संघटनेचा फरार म्होरक्या अमृतपाल याच्या पत्नीला अमृतसर येथे विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. अमृतपालची पत्नी किरणदीप सकाळी लंडनला पळून जाण्याचा तयारीत असताना अमृतसर विमानतळावर तिला इमिग्रेशन अधिकाऱयांनी ताब्यात घेतले. किरणदीप ब्रिटिश नागरिक असून तिच्यावर ब्रिटनमधील बब्बर खालसा या खलिस्तान संघटनेशी संबंध असल्याचा आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप आहे. किरणदीपने गेल्या महिन्यात अमृतपालबरोबर लग्न केले होते.




























































