
>>डॉ. संजय बोरुडे
पारंपरिक व सांस्कृतिक स्वरूपाचा आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय, अशी तारा भवाळकरांनी लोककथेची व्याख्या केली आहे. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा हीसुद्धा समूहनिर्मित आणि समूहाद्वारे रक्षित असते. ती परंपरागत तरीही ती परिवर्तनशील आणि प्रवाही असते. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा रीतीने पिढ्यानपिढ्या जतन केली जाते.
माणसाला प्राचीन काळापासून आपले अनुभव दुसऱयास सांगण्याची व ऐकण्याची आवड आहे. ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या कथन प्रक्रियेतून लोककथा निर्माण झाल्या. त्यानुसार ‘ज्या कथांना कोणी विशिष्ट असा कर्ता नसतो अशा मौखिक परंपरेने चालत आलेल्या निवेदनप्रधान गोष्ट म्हणजे लोककथा’ अशी व्याख्या करता येईल.
कित्येक लोककथा या एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱया प्रदेशात तसेच एका संस्कृतीतून दुसऱया संस्कृतीत प्रवास करतात व अशा प्रवासात त्यांची रूपेही बदलत जातात. त्या त्या भौगोलिक प्रदेशाच्या, सांस्कृतिक वैशिष्टय़ांच्या स्वरूपांनुसार त्या कथा वेगवेगळी रूपे धारण करतात. या लोककथा जगभर प्रवास करीत आल्या आहेत. याचे कारण भटके लोक. जनावरांचे कळप घेऊन प्रवास करणारे भटके लोक मानवाच्या पशुपालक अवस्थेपासूनच आहेत. मिठाचा व मसाल्याचा व्यापार करणारे बंजारासारखे लोक किंवा मुसाफिरखान्यांमध्ये रात्री मुक्कामाला येणाऱया भटक्या लोकांकडून लोककथा जगभर पसरल्या. देशोदेशीच्या वाटा तुडवणाऱया या लोकांकडे चमत्कारिक अनुभव, अद्भुत कथानकांची रेलचेल असायची. म्हणून थोडय़ाफार फरकाने सारख्याच लोककथा वेगवेगळ्या भागांत आढळतात. मात्र, खालील लोककथा जगाच्या सर्व भागांत, सर्व भाषांत आढळते. प्रदेशानुसार तिच्या मूळ कथासूत्रात कोणताही बदल झालेला नाही असे मत रॉबिन रॉयचौधुरी यांनी व्यक्त केले आहे. ती कथा थोडक्यात अशी आहे –
आईवडील नसलेला एक मुलगा त्याच्या आजीसोबत राहत होता. तो मोठा झाला तरी काही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे आजी त्याला खवळायची. तरीही त्याच्यात काही बदल होत नाही हे पाहून एक दिवस आजी त्याला हाकलून देते, ‘‘चार पैसे कमावून आणल्याशिवाय परत तोंड दाखवू नकोस’’ असे सुनावते. त्यामुळे मुलगा वैतागतो आणि एक कांबळं घेऊन, रुसून घरातून बाहेर पडतो. तो लांब चालत राहतो. घर, गाव ओलांडून तो जंगलवाटेने चालत राहतो. जंगलात चालून थकल्यावर तो एक चांगलं झाड पाहतो अन् त्यावर चढून बसतो. रात्री फांदीच्या एका दुबेळक्यात तो कांबळं पांघरून झोपतो.
मध्यरात्री चार चोर आपला चोरीचा माल घेऊन नेमक्या त्याच झाडाखाली वाटणीला बसतात. नेमक्या त्याच वेळी झाडावर झोपलेल्या मुलाच्या अंगावरचं कांबळं खाली चोरांच्या अंगावर पडते. चोरांना वाटते भूतच आले. त्यामुळे चारही चोर घाबरून ‘‘भूत, भूत’’ असे ओरडत ओरडत पळून जातात. मुलगा त्या झाडावरून खाली उतरतो. चोरीचा माल, पैसे घेऊन सकाळी घरी परत येतो. त्याची आजी त्याने पैसे कमावून आणलेले पाहून आनंदित होते.
ही कथा जगातील प्रत्येक देशात व प्रत्येक भाषेत आहे. तपशिलाचा किंवा वर्णनाचा भाग यातच फरक आढळतो. यावरून लोककथेचे सामर्थ्य आणि वैश्विकता लक्षात येते.
मात्र, लोककथा या मूळ मौखिक परंपरेतून आल्या असल्या तरी कालांतराने लिखित रूपात ग्रंथबद्ध होऊ शकतात. काही आद्य मूलबंध आणि रचनात्मक प्रारूप-आराखडे अनेक लोककथांतून पुनरावृत्त होताना दिसतात. लोककथांचा उगम अनिश्चित असून तो कुठेही, केव्हाही झालेला असतो. सांगणारा आणि ऐकणारा यांच्यात एक बंध दिसून येतो. लोककथा या साध्यासुध्या गोष्टी असतात तशा गुंतागुंतीच्याही असतात. आजोबाने किंवा आजीने नातवाला गोष्टी सांगणे यांच्यात एक बंध आहे आणि तो लोकसाहित्य परंपरेचाच आविष्कार होय. पारावर रंगणाऱया गोष्टी याही अशाच प्रकारात मोडतात. लोककथा एका पिढीकहून दुसऱया पिढीकडे अगदी सहज, विनासायास प्रवास करतात. लोककथेचा विस्तार भौगोलिकपेक्षा सांस्कृतिक परिसरात होतो.
अठराव्या शतकात ‘मुलांच्या आणि घरगुती कथा’ यांचे संकलन करून लोककथांच्या शास्त्र्ााrय अभ्यासाचा पाया घातला गेला. एकोणिसाव्या शतकात मॅक्स म्युलर यांनी भाषाशास्त्र्ााचा अभ्यास करीत असताना तौलनिक दैवतकथांच्या अभ्यासाकडे लक्ष वळवले. याच काळात संस्कृत ‘पंचतंत्रा’चे भाषांतरकार बेन्फाय यांचे हिंदुस्थानी कथानिधानाकडे लक्ष वेधले आणि ‘‘भारत ही जागतिक कथावाङ्मयाची गंगोत्री आहे’’, असा सिद्धांत त्यांनी मांडला. पुढे अनेक संशोधकांनी तो मान्य केला.
वैदिक वाङ्मयात अनेक कथांची बीजे आढळतात व नंतरच्या पुराण वाङ्मयात पुरुरवा-उर्वशी, जरत्कारू, उपरिचर वसू अशा अनेक कथा त्यातूनच विकसित झालेल्या दिसतात. प्रथम वररुचीने प्राकृतामध्ये व नंतर गुणाढय़ाने पैशाची प्राकृतमध्ये लोककथांचा प्रचंड संग्रह करण्याचा खटाटोप केला. ‘बृहत्कथा’ या नावाने अखिल हिंदुस्थानीय स्वरूपाचा हा संग्रह प्रसिद्ध आहे. लोककथांमध्ये नक्षत्रकथा, दैवतकथा, जातककथा, कहाण्या, जादूच्या गोष्टी, परिकथा, प्राणिकथा, प्रवासकथा, आख्यानकथा, दृष्टांतकथा, कूटकथा, अद्भुत कथा, पुराणकथा आदी अनेक प्रकारच्या कथांचा समावेश होतो. निरक्षर लोकांनीही मौखिक परंपरेने लोककथा जतन केल्या आहेत.
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने नव्हती. त्यामुळे गावोगाव अशा लोककथा सांगणाऱयांना मान असे. आमच्या लहानपणी शेजारच्या निरक्षर सुगराबाई या रात्रभर अनेक गोष्टी सांगायच्या त्या ऐकण्यासाठी अख्खी गल्ली जमायची. भिगवण कुर्डूवाडी रेल्वे रुळाच्या कामासाठी येणारे कामगार सुट्टीच्या आदल्या रात्री उंदीरगाव, ता.करमाळा येथील गंगाराम लोहकरे यांना बोलवायचे. ते रात्रभर एकच कथा घोळून घोळून सांगायचे. आजही त्यांच्याकडे हे काwशल्य जतन केलेले आढळते.
लोककथा मनोरंजनासोबत व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाचा हातभार लावतात. व्यावहारिक शहाणपण शिकवणाऱया या लोककथा बदलत्या जीवनशैलीमुळे नामशेष होत चालल्या आहेत.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]




























































