पुण्यात भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा छापखाना

100-rs-notes

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये फक्त 100 रुपये किंमतीच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणणाऱया एका भामटय़ाचा गोरखधंदा मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने उद्ध्वस्त केला.त्याला लोअर परळ येथे रंगेहाथ पकडून 100 रुपये किंमतीच्या 896 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक इसम लोअर परळ येथे येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पाटील एपीआय भारती, उपनिरीक्षक उगडे तसेच मांगले, गायकवाड या पथकाने लोअर परळच्या सीताराम मिल कंपाऊंड परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार तो इसम तेथे येताच पोलिसांनी त्याच्याकर झडप घातली.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ फक्त 100 रुपये दराच्या 876 बनावट नोटा मिळाल्या. या नोटा तो दौंड येथे एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये छापत असल्याची माहिती देताच पोलिसांनी त्या फ्लॅटवर धडक दिली.

त्या फ्लॅटमध्ये पोलिसांना लॅपटॉप, लेझर स्कॅनर प्रिंटर, लॅमीनेटर, अर्धकट छपाई झालेल्या नोटांचे बंडल, हिरव्या रंगाचे फॉईल पेपर, आदी साहित्य सापडले.दिपक गुंगे असे त्या भामटय़ाचे नाक असून कोणालाही संशय येऊ नये तसेच नोटा चलनात आणणे सोयीचे जावे यासाठी केवळ 100 किंमतीच्याच बनावट नोटा छापत असल्याची कबुली दीपक याने चौकशीत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या