
कोयत्याच्या धाकाने गॅस सिलेंडर वाहतूकदाराला लुटणाऱ्या तडीपाराला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे .आरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय 22 रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खडक, समर्थ, लष्कर पोलीस ठाण्यांतर्गत मारमारी, घातक शस्त्र बाळगणे, घरफोडी, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मांगुसींग रामसिंग मांगलिया यांनी तक्रार दिली आहे.
मांगुसिंग गॅस डिलेव्हरी करणोर असून 28 ऑगस्टला ते भवानी पेठ येथे गॅस देउन तालीम चौकात चहा पित थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या सराईताने असतांना ते ओळखत असलेला सराईत आरबाजने कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 10 हजारांची रोकड चोरून नेली होती. त्यानुसार खडकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू होता. गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्याला लुटणाऱ्याची माहिती पोलीस हवालदार फहिम सैय्यद यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरबाज उर्फ बबन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 हजार 700 रूपये आणि कोयता जप्त करण्यात आला. जानेवारीमध्ये त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, एपीआय राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, संजय लोखंडे, यशपाल सुर्यवंशी फहिम सैय्यद, संदिप पाटील, रवी लोंखडे, नितीन जाधव राहुल मोरे, किरण शितोळे, हिम्मत होळकर, कल्याण बोराडे, विशाल जाधव, घाडगे, तेजस पांडे, प्रविण गव्हाणे, महेंद्र कोलते यांनी केली.


























































