धक्कादायक; पतीच्या गुप्तांगाची शीर कापून करायचे होते नुपंसक, पत्नीचा डाव उघडकीस

crime

प्रेमासाठी प्रियकर-प्रेयसी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं म्हणतात. मात्र पुण्यामध्ये अशीच घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या गुप्तांगाची शीर कापून त्याला नपुंसक बनविण्याचा कुटील डाव रचल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रियकर आणि प्रेयसीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा आणि सौरभ (दोघांची नावे बदलली आहेत) उच्चशिक्षित असून त्यांचे मार्च महिन्यात लग्न झाले आहे. लग्नापुर्वी रेश्माचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, सौरभशी लग्न झाल्यानंतर रेश्माने प्रियकर अजितशी (नाव बदलले आहे) संपर्क न ठेवण्याचे ठरविले होते. मात्र, एकाच कंपनीत काम करीत असल्यामुळे रेश्मा आणि अजित यांचे पुन्ह सुत जुळले.

लग्न करण्यासाठी दोघांनी सौरभला नपुंसक बनविण्याचा डाव रचला. काही दिवसांनी रेश्मा आणि सौरभ महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी सौरभला दारु पाजून अंधारात त्याच्या गुप्तांगाची शीर कापण्याचे दोघांचे प्लॅनिंग होते. मात्र, रेश्मा आणि सौरभ फिरत असताना अजित परिसरात सातत्याने दिसत होता. शंका आल्यामुळे सौरभने रेश्माचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये अजितचे मेजेस दिसून आले. त्यामध्ये नपुंसक बनविण्यासाठी मेसेज वाचल्यानंतर सौरभला धक्का बसला. त्याने महाबळेश्वरमधून काढता पाय घेत वारजे पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर वारजे पोलिसांनी प्रियकर अजित आणि प्रेयसी रेश्माला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

प्रियकर-प्रेयसीने असा रचला डाव

फिरण्याच्या बहाण्याने पती सौरभला घेउन महाबळेश्वरला गेल्यानंतर त्याला भरपूर दारु पाजायची. त्यानंतर प्रियकर अजितला हॉटेलमध्ये बोलावून सौरभच्या गुप्तांगाची शीर कापून पत्नी रेश्माला किरकोळ जखम करण्याचा डाव दोघांनी रचला होता. हॉटेलमध्ये चोरट्यांनी हल्ला करुन सौरभला जखमी केल्याचे भासवित त्याला नपुुंसक करायचे. त्यानंतर प्रियकर अजितसोबत पुन्हा संसार थाटायचा असे प्लॅनिंग करण्यात आले होते.

प्रियकराच्या मदतीने पतीच्या गुप्तांगाची शीर कापून त्याला नपुंसक बनविण्याचा डाव दोघांनी रचला होता. मात्र, पतीला पत्नीच्या मोबाईलमधील मेसेजचे चॅटिंग दिसून आल्यानंतर  कटकारस्थान उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीचे समुपदेशन करण्यात येत असून तपास सुरु आहे. – मच्छिद्र पंडीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी

आपली प्रतिक्रिया द्या