
सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार,पंती पाकुळी सोरट अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकुन २३ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सिंहगड रोड, परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण मटका जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला असता तेथे 23 जण बेकायदेशीर मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 1 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेद्र चव्हाण यांनी केली आहे.


























































