
पुण्यात मालवाहू टेम्पोवर दगडफेक करून चालकाला धमकावून त्याच्याकडील 18 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 8 डिसेंबरला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी परिसरात घडली.
याप्रकरणी विजय कोतवाल (वय 45, रा. म्हातोबाची आळंदी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजय कोतवाल 8 डिसेंबरला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास टेम्पोतून माल घेउन मार्केटयार्डाकडे चालले होते. त्यावेळी शेवाळवाडी परिसरात टोळक्याने त्यांच्या टेम्पोवर दगडफेक करून विजयला वाहन थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर चोरट्यांनी 8 हजारांची रोकड आणि 10 हजारांचा मोबाइल असा 18 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.
























































