पोलिस चेकिंगच्या नावाखाली जेष्ठ महिलेचे 60 हजारांचे मंगळसूत्र केले लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरदिवसा चोरट्यांनी जेष्ठ महिलेला आगे पुलिस चेकिंग सुरू है, सोना पहनके घुमना नही है, हम पुलिसवाले है, असे म्हणत त्यांच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र घेउन पोबरा केला आहे. ही घटना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील वनदेवी मंदीरासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी अलका कुंडलीक बोराटे (वय 65, रा. गांधीभवन फाटा, कोथरूड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला अलका काल दुपारी रस्त्याने घरी चालल्या होत्या. त्यावेळी तिघा चोरट्यांनी त्यांना थांबवून आगे पुलिस चेकिंग सुरू है, सोना पहनके घुमना मना है, हम पुलिसवाले है असे म्हणत अलका यांच्या गळ्यातील 60 हजार रूपयांचे मंगळसूत्र ताब्यात घेतले. त्यानंतर चोरट्यांनी हातचलाखीने त्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी अलंकार पोलिस तपास करीत आहेत.