देवगड समुद्रात बुडून पुण्यातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, एक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड येथे फिरायला आलेले पुण्यातील सहा विद्यार्थी समुद्रात पोहताना बुडाल्याची घटना समोर आली आहे. या सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एक जण बेपत्ता आहे. तर एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहाजण बुडाले. त्यातील पाच जणांना बचाव पथकाने बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यातील प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे या चौघींचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरू आहेत.