हवेलीतील गोर्‍हे बुद्रूकमध्ये कोयता गँगला अटक, गाडी हळू चालविण्यास सांगितल्याने झाला होता वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी हळू चालविण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेला धक्काबुक्की करीत कोयत्याच्या धाकाने परिसरात दहशत माजविणार्‍या पाच जणांच्या कोयता गँगला हवेली पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी हवेली तालुक्यात गोर्‍हे बुद्रुक येथे घडली होती. टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून, लोकांना शिवीगाळ व दमदाटी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

नीलेश श्रीराम साह वय 23, अक्षय सुरेश चव्हाण वय 23, सागर कांतू पाटील वय 22, निकुन उर्फ अनिकेत विनायक भोर वय 22 सर्व रा. गोर्‍हे बुद्रूक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. यापुर्वी या टोळीविरूद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी महिलेला शिवीगाळ व दमदाटी करुन धक्काबुक्की केली होती. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, हवेली ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, एपीआय नितीन नाम, राजेंद्र मुंडे, दिपक गायकवाड, श्रीकांत खंडागळे, मकसूद सय्यद, पाटसरकर, राणे, आंबेकर यांनी केली.

दोन गटातील भांडणातून टोळक्याने गोर्‍हे बुद्रूकमध्ये हातात कोयत घेउन नागरिकांमध्ये दहशत माजविली होती. मात्र, हवेली पोलिसांनी लागलीच टोळतील चौघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे