धक्कादायक… पुण्यात संशयापोटी नवऱ्याने बायकोला पेटवून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पत्नीवर संशय घेत नवऱ्याने ‘तुझे बाहेर कोठेतरी काहीतरी चालू आहे’ असे बोलून 30 वर्षीय विवाहितेला पेटवून देत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपूर्वी एसएसपीएम कॉलेजशेजारील सर्वंट क्वाटरमध्ये घडली आहे.

याप्रकरणी सुरेखा दत्ता कसबे (वय 30) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती दत्ता सुरेश कसबे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा आणि दत्ता पती-पत्नी आहेत. मागील काही दिवसांपासून दत्ता पत्नी सुरेखावर नेहमी संशय घ्यायचा. ” तुझे बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे” असे सातत्याने बोलत होता.

पतीच्या संशयी वृत्तीला कंटाळून सुरेखाने घरातील रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्याचवेळी दत्ताने काडी पेटवून सुरेखाच्या अंगावर दिली. त्यामुळे सुरेखा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.